Monday, August 30, 2010

गोकुळअष्टमी, गोपाळकाला

श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. दिवसभर उपास देखील करतात, संपूर्ण रात्र भजन, किर्तन यामध्ये घालवतात. दुसरा‌ दिवस असतो तो गोपाळकाल्याचा. दही, दूध, लोणी, पोहे व लाह्या एकत्र करुन मटक्यात भरतात, त्याची दहिहंडी तयार केली जाते, ती लहान बाळगोपाळांकडून फोडली जाते. अश्याप्रकारे हे दिवस अतिशय उल्हासात पार पाडतात.

आता मात्र या उत्सवाला स्पर्धा आणि एक करमणूक  असे स्वरुप मिळाले आहे, त्यामागचा धार्मिक भाव कुठेच दिसत नाही. पण त्यामगचा उद्देश मात्र आजही जपला जातो, रोजच्या कामातुन, धकाधकीतुन वेळ काढुन लोक एकत्र येतात. एकमेकांच्या विचांरांची देवाणघेवाण केली जाते आणि परत एकदा दाखवून दिले जाते, "एकी हेच बळ".

तरी गोकुळअष्टमी, गोपाळकाला, दहिहंडी या विषयांवर या व्यतिरिक्त अजून काही माहिती असल्यास पाठवावी.

2 comments:

  1. काही ठिकाणी मातीचे गोकुळ करुन गोकुळाष्टमी साजरी करतात, त्याबद्दल काही माहिती असल्यास कळवा.

    ReplyDelete
  2. ताई,
    आज मराठीसुची वर तुमची पोस्ट प्रकाशीत झालेली पाहीली, पोस्ट पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगला भेट दिली, आपला ब्लॉग अतिषय सुंदर झाला आहे, मराठी संस्कृतीबद्दल आपली आत्मीयता बघुन आनंद वाटला.आपल्यामुळे मराठी महीलांना मराठी संस्कृतीबद्दल नवनवीन माहीती मिळेल, मी तुमचा ब्लॉग माझ्या पत्नीस दाखवला, तिलाही आपला ब्लॉग खुप आवडला.

    ReplyDelete