Saturday, September 4, 2010

भाद्रपद - हरतालिका पूजन

नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे 'हरतालिका' हे व्रत सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत केल्यामुळेच पार्वतीला भगवान शंकर वर म्हणुन प्राप्त झाले, अशी कथा आहे.
भाद्रपद शुद्ध तृतीयेला मुली, सुवासिनी हे व्रत करतात. आंघोळ करुन, नदीतील वाळू आणतात. त्या वाळूची शिवलिंगे स्थापन करतात. परंतु अता बहुतेक ठिकाणी सखीसह पार्वतीच्या मातीच्या मूर्ति मिळतात. त्या स्थापून त्यांची पूजा करतात. पूजेचे ठिकाणी तोरण, केळीचे खुंट बांधतात, रांगोळी काढतात. फुले, विविध फुलाफळांच्या झाडांची पाने पत्री म्हणुन वाहतात. दिवसभर कडक (पाणी पण न पिता) उपास करतात.रात्री कहाणी व जागरण करतात. रात्री बारानंतर रुईच्या पानावर दही घालुन चाटतात. नंतर सकाळी उत्तरपूजा करुन व्रताचे विसर्जन करतात. हे व्रत केल्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य वाढते, असे म्हणतात.

1 comment:

  1. वाह आकांक्षाजी तुमचाही ब्लॉग आवडला...तुम्हीही तुमच्या परीने खूप चांगले काम करीत आहात. अशीच माहिती देत रहा...आम्ही येऊ नेहमी वाचायला. आवडली वा उपयुक्त वाटली तर इतरांबरोबर शेअरही करू. तुम्ही फक्त लिहीत जा. अशीच सणाबद्दलची वेगवेगळी माहिती इतरांनीही इतरांबरोबर शेअर केली तर फार चांगला अवेरनेस होईल. लोकांना त्याचा उपयोग होईल. असो....
    best of luck for your writing and blog. :)

    ReplyDelete